होमिओपॅथी परिक्षेत डॉ. योगेश्वरी पाटीलचे यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात राहणाऱ्या डॉ. योगेश्वरी पाटील यांनी नुकतीचे वैद्यकीय होमिओपॅथी क्षेत्रातील अंतिम वर्षाची परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

डॉ.योगेश्वरी पाटील या साईबाबा पतसंस्थेचे चेअरमन भाऊराव पाटील व ताराबाई पाटील विरावली यांची नात असून साई बाबा संस्थेचे संचालक तथा प्रगतशील शेतकरी दिनकर पाटील व शिक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी शिरपूर येथील के.डी.एम.जी होमिओपॅथ या महाविद्यालयातुन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांना त्यांच्या विद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक डॉ.बी एस पाटील,प्रा डॉ संजय रुद्र यांचे मार्गदर्शन लाभले डॉ योगेश्वरीचे सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत सत्कार करत तिचे कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content