यावल प्रतिनिधी । पीक विम्यासह विविध विषयांसाठी आज जळगावात काढण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चात जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र पाटील यांच्यासह सहकारी सहभागी झाले होते.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या हवामान आधारित केळीपीक विम्याचे निकष अन्यायकारक पद्धतीने बदलण्यात आलेले असून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळूच नये अश्या पद्धतीने राज्य सरकारतर्फे सोय करण्यात आली आहे. वारंवार मागण्या-निवेदन देऊन सुद्धा सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.तेव्हा या सरकारच्या निर्णया विरोधात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय लक्षात घेऊन शेतकरी बांधवांसह माजी मंत्री गिरीष महाजन व खा. रक्षा खडसे,खा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि.९ रोजी जळगाव येथे भाजपा तर्फे विराट मोर्चा काढण्यात आला.
या विराट मोर्चात जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील(छोटुभाऊ), यावल पंचायत समिती उपसभापती दिपक पाटील,मनवेलचे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या सह परिसरातून पदाधिकारी व शेतकरी बांधव सहभागी झालेले होते.यावेळी सभापती रविंद्र पाटील यांच्या सह तालुक्यातील भाजप पदाधिकारी बैलगाडीत बसून मोर्चात लक्ष वेधत होते.एक शेतकरी म्हणून नरेंद्र पाटील(मनवेल) यांनीही राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी निर्णया बाबत सडेतोड विचार व्यक्त करून केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या.