भडगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती रिंगणात; ४ ग्रामपंचायती बिनविरोध

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत पैकी मांडकी, पांढरद, पळासखेडे, लोण प्र.भ. या 4 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्या असून २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होत आहे. 

 काही ग्राम पंचायत चे एक दोन जागेसाठी गाव बिनविरोध होण्याची संधी हुकली आहे. जुवार्डी येथे चुलतसासू विरुद्ध सून व नणंद विरुद्ध भावजाई अशी समोरासमोर लढत आहे. भडगाव तालुक्यात एकूण ३३ ग्रामपंचायतीच्या ३०९ जागांसाठी ९४२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.त्यात आज अखेर ३९५ इच्छुकांनी माघार घेतली तर याच वेळी १११ उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून आले. राहिलेल्या जागांसाठी ४३६ उमेदवार रिंगणात आहेत. 

तालुक्यातील पळासखेडे – रुपनगर येथील ग्रामपंचायत चे तीनही वार्डातील ९ उमेदवारांची  बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यात संगीताबाई बाबुराव पाटील, मंगलकोरबाई भारत पाटील, ललिताबाई अमृत पाटील, परमेश्वर आधार पाटील, आशाबाई गोरख पाटील, भगवान मधुकर भिल, सुनील सरदार पवार, प्रकाश बुधा जाधव, प्यारीबाई पराग जाधव असे १ ते ९ सदस्यांची तीन वार्डात अविरोध निवड ग्रामस्थ गुलाब पाटील, विजय पाटील, भारत पाटील, बाबुराव पाटील लक्ष्मण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून नंदकिशोर बैरागी यांनी कामकाज पाहिले.  

पंढरद ग्रामपंचायतीत सर्व ७ लोक बिनविरोध म्हणून गोकुळ दिलीप भिल, सुशील अशोक भिल, द्वारकाबाई दगा पाटील, मनीषा भाऊसाहेब पाटील, बेबाबाई अशोक कोळी, तुषार साहेबराव पाटील, निर्मालाबाई लक्ष्मण पाटील, मांडकी ग्राम पंचायतीतील सर्व ७ जागा बिनविरोध झाल्या असून यात सुनील रोहिदास पगारे, किशोर भास्कर पाटील, सुलक्षणा रवींद्र चौधरी, अशोक दौलत वाघ, सोनिया अशोक भिल, राहुल संजीव पाटील, अमृता प्रदीप चौधरी, लोण प्र.भ. ग्राम पंचायतच्या सर्व ७ जागा बिनविरोध निवडून आल्या यात प्रमिलाबाई पंडित माळी, विठाबाई शिवराम पाटील, जीभाऊ अर्जुन पाटील, अशोक रामभाऊ पाटील, सुनंदा गिरधर पाटील, दिगंबर मारुती खवले, कविता सुदाम पवार अशी नावे आहेत . 

माघार घेतल्या नंतर निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी कपबशी, शिट्टी, फुगा, पंखा आदी चिन्ह घेण्यास उमेदवार इच्छुक दिसले.

 

 

 

 

Protected Content