यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तहसीलदाराच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या गस्तीवर असलेल्या फिरते पथकाच्या कार्यवाहीत विनापरवाना अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून, प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात महसूल प्रशासनाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बामणोदच्या मंडळ अधिकारी बबीता चौधरी, यावलचे तलाठी ईश्वर कोळी, साकळीचे तलाठी मिलींद कुरकुरे यांच्यासह तहसीलदारांचे वाहनचालक अरविंद बोरसे यांच्या पथकाने दिनांक २ जानेवारी मंगळवार रोजी सकाळच्या सुमारास गस्तीवर असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांच्या पथकाने यावल शिवारातील साठवण तलाव परिसरातून विनापरवाना विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर व्दारे वाळुची अवैध वाहतुक करतांना आढळून आली.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व त्यांच्या पथकाने ही दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून ताब्यात घेतली असून, वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे.