जळगाव प्रतिनिधी । सिंधी कॉलनी परिसरात बेकायदेशीर तलवार बाळगणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून ३० इंच लांबीची तलवार हस्तगत केली आहे. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहित अशोककुमार माकडीया (वय-२१) रा. कंवर नगर सिंधी कॉलनी असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिंधी कॉलनी परिसरात एक २१ वर्षीय तरूणी हातात तलवार घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, सुधीर साळवे, सचिन पाटील, पो.कॉ. चंद्रकांत बळीराम पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी मोहिती माकडीया याला आज गुरूवार २ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता सिंधी कॉलनी परिसरात अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३० इंच लांबीची तलवार हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे सिंधी कॉलनी परिसरात खळबड माजली होती. गेल्या काही दिवसांत सिंधी कॉलनी परिसरात अनेक गुन्हे घडले असून दोन दिवसात तीन गुन्ह्याचा एमआयडीसी पोलीसांनी छळा लावला आहे.