पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा प्रतिनिधी शहरातील नागरिकांना स्वर्ग रथासाठी भटकंती करावी लागत आहे आणि एरंडोल, धरणगाव, अमळनेर बाहेर गावावरून स्वर्गरथ मागवावा लागत आहे आणि गोर-गरिबांना जास्त पैसे मोजावे लागत आहे.
जवळपास पारोळा शहरांचे रहिवास जळगावकडे म्हसव्यापर्यंत रहिवास आहे आणि अमळनेरकडे राम चैतन्य नगर पर्यंत रहिवास झाला आहे आणि दोन ते अडीच किलोमीटरच्या जवळपास रहिवासी आहेत प्रेत यात्रा खांद्यावर अन्न शक्य नाही आहे. त्यासाठी स्वर्ग रथाचे पारोळा शहराला फार आवश्यकता आहे. परंतु पारोळ्यामध्ये नगरपालिकेच्या आणि आमदार-खासदार निधीच्या आतापर्यंत एकही स्वर्ग रथ आलेला नाही आहे भवानी गडाच्या स्वर्ग रथ होता तोही ना दुरुस्त आहे. खाजगी स्वर्ग रथ होते तेही नादुरुस्त झालेले आहेत.
प्रत्येक तालुक्यात आमदार निधीतून स्वर्ग रथ आहेत आणि काही ठिकाणी नगरपालिकेचेही स्वर्ग रथ आहेत. परंतु पारोळ्यात कुठलाच स्वर्ग रथ नाही आहे. त्यासाठी पारोळा शहरातील नागरिकांना धरणगाव-एरंडोल येथून स्वर्ग रथ मागवा लागत आहे व बाहेर गावावरून गोर-गरीब लोकांना एवढे तीन हजार रुपये देणे शक्य नाही आहे. पारोळा नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे त्याकडेही दुर्लंक्ष केले जात आहे परंतु पारोळा शहरातील नागरिकांच्या प्रश्नाकडे एरंडोल पारोळा मतदारसंघाचे आमदार लक्ष देतील का असे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात बोलले जात आहे.