पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्री. संत शिरोमणी सेनाजी महाराज पुण्यतिथी व गुणवंत विद्यार्थी गुण गौरव सोहळा गजानन महाराज मंदिर, पुनगाव रोड, पाचोरा येथे मोठ्या उत्साहाने पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सन २०२० – २१ या कोरोना काळात तसेच वृद्धापकाळाने, अकाली मृत्यू झालेल्यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर संत शिरोमणी सेनाजी महाराज रथाचे पूजन सामाजिक कार्यकर्ते अनिल अहिरे यांनी सपत्नीक पुजन केले. तसेच गुणवंतांना पारितोषिक वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्ह्यातून आलेले पदाधीकारी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य संपर्क प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर सूर्यवंशी हे होते. महाराष्ट्र नाभिक महामंडळ तसेच जिल्हाध्यक्ष बाराबलुतेदार महासंघ जळगाव तसेच अलका सोनवणे (जन सेवा पक्ष व पोलीस क्राईम रिपोर्टर), महाराष्ट्र नाभिक महामंडळ जेष्ठ पत्रकार मोहन साळवी, कर्मचारी संघटनेचे जिल्हा नेते रविंद्र बोरनारे, सेवानिवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी नारायण सोनवणे, नाशिकहून आलेले वारुळे, जेष्ठ सल्लागर भास्कर सान्नासे, बारकू सोनवणे, जेष्ठ मार्गदर्शक काशिनाथ सोनवणे, रामभाऊ खोंडे (म.ना.महामंडळ), प्रसिद्ध अॅड. शांतीलाल सौंदाने हे पदाधिकारी व्यासपिठावर होते. तसेच पाचोरा नाभिक समाजाचे अध्यक्ष रमेश जाधव यांचा वाढदिवस संत सेनाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच असतो.
उपस्थितांतर्फे कार्यक्रम स्थळी रमेश जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. व सर्व मान्यवरांनी तसेच पाचोरा शहर समाज व मित्र मंडळ त्यांना शुभेच्छा दिल्यात. श्री. संत शिरोमणी सेना महाराजाचा रथ मिरवणूकीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता पार पडला. मिरवणुकीत महिलांसाठी साडीचा लकी ड्रॉ काढण्यात आला. रथ यात्रेत केवलगिरी बॅण्ड पथकाची भक्तीपर गीत तसेच सेना महाराज गीत सेना महाराजांचे अभंग गाऊन सर्वांना मंत्र मुग्ध केले. विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते स्कूल बॅग, ट्रॉफी, प्रमाणपत्र, गुलाब पुष्प, देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी कु. मनिषा रमेश जाधव हिने समाजावर आधारित प्रबोधन पर समर गीत म्हटले. तसेच स्मृती प्रित्यर्थ (स्मरणार्थ बक्षिसे वाटप करण्यात आले), त्यासोबतच भूखंड देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. तसेच पाचोरा शहाराचे नाभिक समाज अध्यक्ष रमेश जाधव यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे मुंबई यांच्या आदेशाने महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ही घोषणा व्यासपिठावरील सर्व पदाधिकार्यांनी केली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव, अनिल अहिरे, जगन्नाथ सोनवणे, योगराज सोनवणे, रमेश सोनवणे, सुनिल अहिरे, दिपक चित्ते, जितेंद्र सोनवणे, गुलाब ठाकरे, अनिल चित्ते, आकाश जाधव, प्रमोद पिडिहार, मनोज ठाकरे, नितीन वारुळे, सुरेश चित्ते, राकेश अहिरे, पिंटू वाघ (भोजे – चिंचपुरे), संदीप अहिरे, कैलास अहिरे (वेध ग्राफिक्स), कैलास वाघ, रमेश चित्ते, विजय मानकरे, शोभा जाधव, कल्पना अहिरे, मनिषा जाधव, मोहित जाधव, हर्षल जाधव, दर्शन पिडिहार सह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिपक चित्ते यांनी केले. तर प्रस्ताविक रमेश जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार योगराज सोनवणे यांनी मानले. रात्री ८ ते १० वाजे दरम्यान ह.भ.प. बबनजी महाराज धरणगावकर यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम पार पडला.