जळगाव प्रतिनिधी । शहरातील मयूर तायडे हे नुकतेच एम.डी. मेडीसिन परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
त्यांनी ही परीक्षा मध्यप्रदेशातील भोपाळ येथील गांधी मेडिकल कॉलेज येथुन उत्तीर्ण केली. एम.बी.बी.एस त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई (जे.जे.हास्पीटल) याठिकाणाहन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. तसेच डॉ. मयूर यांनी आतापर्यंत अनेक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांना अभ्यासासोबतच वाचन, स्पर्धा परीक्षा आणि संगीताची आवड आहे. डॉ. मयूर हे एम.जे.कालेजचे माजी उपप्राचार्य आणि हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुरेश तायडे यांचे चिरंजीव आहेत.