कोथळी गावात कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना केले शेतीविषयक मार्गदर्शन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतिम वर्षाचे विद्यार्थी कोथळी येथे दाखल झाले असून, या कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कृषी कन्या प्रेरणा बाविस्कर,दिप्ती चऱ्हाटे समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील,दीक्षा सोनवणे ह्या विद्यार्थीनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गावात राहणार असून, शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांद्वारे आणि प्रात्यक्षिकांच्या साह्याने माहिती देणार आहेत.

शेतजमिनीचे माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्राज्ञान, पिकांवर येणारे रोग व त्यासंबंधित माहिती व त्यांचे निवारण या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कृषी कन्यांसोबत गावातील सरपंच नारायण नामदेव चौधरी , उपसरपंच श्री पंकज अशोक राणे व गावातील शेतकरी उपस्थित होते आणि शेतकऱ्यांची भेट घेऊन कृषि कन्या कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्दिष्ट व त्यासंबंधित ग्रामस्थांशी वेळोवेळी चर्चा करणार आहेत. शेतकऱ्याना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येत आहे.

Protected Content