मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरामध्ये किड्स झोन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पालकांसोबत बोलावून त्यांना एक झाडाचे रोपटे वाटप करण्यात आले व एक पेड मागे असे उपक्रमाला नाव देण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पालकांसोबत एक झाडाचे रोपटे देऊन त्यांना त्यांच्या घराच्या आवारामध्ये लावण्यासाठी सांगण्यात आले. या उपक्रमाचे मुक्ताईनगर शहरांमधूनच नव्हे तर तालुका भरातून कौतुक होत आहे. इतका चांगला उपक्रम या शाळेमध्ये राबविण्यात आला. तहसीलदार वाघारे, पोलीस निरीक्षक मोहिते, शाळेचे अध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील, मुख्याध्यापक सोनवणे, मुख्याध्यापिका वैशाली दुट्टे हे सर्वजण उपस्थित होते.