जामनेरात गॅस कटरने एटीएम फोडून लाखोंची रोकड लांबविली; चोरटे सीसीटीव्हीत कैद

जामनेर प्रतिनिधी । शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरने कापून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघकीला आला आहे. चोरी करतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.  याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर या बँकेच्या एटीएम जवळ कोणते प्रकारे सुरक्षारक्षक नसल्यामुळे एटीएममध्ये चोरी झाल्याची चर्चा नागरिकात पाहायला मिळाली होती. याप्रकरणी शाखाधिकारी प्रसुन परेशनाथ घोष (वय-३६) रा. जामनेर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

Protected Content