जामनेर तालुक्यात दुमदुमला नारा-कहो दिल से. . .रक्षाताई फिरसे !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये रक्षाताई खडसे यांच्या प्रचार फेर्‍यांना अतिशय उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले आहे. ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले असून पदाधिकार्‍यांनी लाखापेक्षा जास्त मतांचा लीड देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

महायुतीच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांना लागोपाठ तिसर्‍यांदा उमेदवारी मिळाली असून त्यांच्या प्रचाराला प्रचंड वेग आलेला आहे. आज सकाळपासून त्यांनी जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार सुरू केला आहे. यात प्रारंभी वाडीकिल्ला येथे रक्षाताईंचे स्थानिक पदाधिकार्‍यांनी जोरदार स्वागत केले. यानंतर विविध गावांमध्ये प्रचार फेर्‍या सुरू झाल्या.

आज रक्षाताई खडसे या वाडी किल्ला, वाघारी, बेटावद खुर्द व बुद्रुक, रांजणी, कापूसवाडी, पळासखेडा काकर, देऊळगाव, तोरनाळा, पिंपळगाव, फत्तेपूर आदींसह अन्य गावांमध्ये प्रचार फेर्‍या काढणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी त्यांचे कहो दिलसे-रक्षाताई फिरसे अशा गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.

दरम्यान, आजच्या प्रचार फेरीत भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, राजमल भागवत, शिवाजी सोनार, प्रदीप लोढा, रमेश नाईक, माजी जि.प. सदस्य सुनीता पाटील. विलास पाटील, नवल पाटील, भाईदास चव्हाण, रविंद्र झालटे, कैलास पालवे, रामलाल राठोड यांच्यासह जामनेर तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Protected Content