जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील आकाशवाणी चौकातील महादेव सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये आता इंदोर येथील प्रसिध्द न्युरोलॉजीस्ट डॉ. कमलेश तायडे यांची सेवा उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे, दिल्ली आणि इंदोरमधील विस्तृत अनुभव असलेल्या डॉ. तायडे यांनी आपल्या जन्मगावातील लोकांना उच्च प्रतीच्या न्युरोलॉजिकल सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ. कमलेश तायडे यांनी एमबीबीएस पदवी ससून रुग्णालय, पुणे, एमडी पदव्युत्तर सायन रुग्णालय, मुंबई आणि डी एम न्युरोलॉजी एम्स, नवी दिल्ली येथून पूर्ण केली असून सायन रुग्णालय, मुंबई तसेच चोईथराम हॉस्पिटल, इंदोरमधील न्युरोलॉजी विभागाचा प्रगल्भ अनुभव मिळवला आहे. हजारो रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांनी आपल्या कार्यकुशलतेची छाप पाडली आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. तायडे सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत तपासणी करणार आहेत. त्यांनी अर्धांग वायू/पॅरालीसिस/लकवा, मान दुखी, पाठ दुखी, मेंदूचे आजार, सायटिका, डिस्क, मायग्रेन, बोटॉक्स इंजेक्शन, पार्किन्सन, कंपवात, हात-पाय कंपन, डोकेदुखी, चक्कर येणे, बोलण्यात किंवा चालण्यात अडचण, सुन्नपणा, दृष्टी बदलणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा झटके अशा आजारांवर उपचार करण्याची माहिती दिली आहे.
याशिवाय मेंदू, मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यातील बिघाड समजण्यासाठी महत्त्वाच्या तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात EEG (इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी), NCS (नर्व्ह कंडक्शन स्टडी), EMG (इलेक्ट्रोमायोग्राफी), MRI / CT Scan तसेच Lumbar Puncture (कण्यातील द्रव तपासणी) यांचा समावेश आहे. या सर्व तपासण्या न्युरोलॉजी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातील, ज्यामुळे अचूक निदान आणि योग्य उपचार निश्चित करता येतील.
रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार, जळगावमधील नागरिकांनी डॉ. कमलेश तायडे यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.



