जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याची घटना सोमवारी १९ जुलै रोजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी एकावर रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील हरीविठ्ठल नगरात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहाते. सोमवार १९ जुलै रोजी दुपारी १ ते २ वाजेच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. दरम्यान संशयित आरोपी स्वप्निल शरद सोनवणे याने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी स्वप्निल सोनवणे याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून रामानंद नगरपोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजेश शिंदे करीत आहे.