बुलढाण्यात घरावरील पत्र्यांसोबत झोपाळ्यात झोपलेली चिमुकली हवेसोबत उडाली

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. मोसमी वाऱ्याच्या आगमनाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज (बुधवार) बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला. आज मान्सूनचा पहिलाच पाऊस बुलढाणा जिल्ह्यात दमदार बरसला. विजा व वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. या वादळामुळे बुलढाण्यात मोठी दुर्घटना घडली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव घुबे येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराच्याछतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला लहान मुलीसाठी झोपाळा बांधला होता. या झोपाळ्यात चिमुकली झोपली होती. पण वादळी वाऱ्याच्या तडाख्यात घरावरील पत्रे उडाले आणि त्यासोबतच चिमुकलीसह खांबाला बांधलेला झोपाळाही उडाला. साई भरत साखरे असे या चिमुकलीचे नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा बसला. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. देऊळगाव घुबे येथे घडलेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. छतावरील पत्र्यांना आधार देण्यासाठी लावलेल्या खांबाला झोका बांधण्यात आला होता. या झोपाळ्यात चिमुकली झोपली होती. मात्र वादळाच्या तडाख्यात पत्र उडले. पत्र्यांसोबत ही चिमुकली ज्या झोक्यामध्ये होती तो झोका हवेत उंच उडाला. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content