भुसावळ नगरपालिकेत सभापती निवड प्रक्रिया शांततेत (व्हिडीओ)

IMG 20200109 WA0062

भुसावळ प्रतिनिधी । महाराष्ट्रात अ दर्जाची असणारी भुसावळ नगरपालिकेत सभापती निवड पार पडली. सतत चर्चेत असलेल्या भुसावळ नगरपालिकेतील पाच सभापती निवड ही वेळ शांततेत पार पडली.

सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी प्रितमा महाजन, शिक्षण समिती सभापती मुकेश पाटील, स्वच्छता वैयक्तिक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी सोनल महाजन, पाणीपुरवठा व जलनिसारण समिती सभापतीपदी सुभाष नेमाडे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी पूजा सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

तसेच महाराष्ट्र नगरपरिषद पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या तरतुदीनुसार स्थायी समितीसाठी पदसिद्ध सभापती रमण देविदास भोळे नगराध्यक्ष, स्थायी समिती सदस्य शेख सईदा शफी, उपनगराध्यक्ष तथा सभापती नियोजन विकास समिती, स्थायी समिती सदस्य प्रितमा गिरीश महाजन, सभापती सार्वजनिक बांधकाम समिती सदस्य मुकेश नरेंद्र पाटील, सभापती शिक्षण समिती स्थायी समिती सदस्य सोनल रमाकांत महाजन, सभापती स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, स्थायी समिती सदस्य शोभा अरुण नेमाडे, सभापती पाणीपुरवठा व जलनिसारण समिती, स्थायी समिती सदस्य पूजा राजू सूर्यवंशी सभापती, स्थायी समिती सदस्य प्रतिभा वसंत पाटील, स्थायी समिती सदस्य रमेश गुरूनामाल नागरानी, स्थायी समिती सदस्य मीनाक्षी नितीन धांडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र नाटकर, अमोल इंगळे, मुकेश गुंजाळ, प्रमोद नेमाडे, मुन्ना तेली, युवराज लोणारी, सुनिल नेवे, चंद्रशेखर अत्तरदे आणि राजु सूर्यवंशी यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content