अमळनेरात आ.अनिल पाटलांच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात निधी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । एप्रिल हिटमुळे अमळनेर परिसर तापत असतानाच आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण मतदारसंघात गाव विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून सन 2021 व 22 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधीनी सुचविलेल्या ग्रामिण भागात गावा अंतर्गत मूलभीत सुविधा पुरविणे लेखाशीर्ष 2515 व 1238 या योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघातील विकासकामांना  ही मंजुरी मिळाली आहे.यात अमळनेर मतदारसंघातील अमळनेर तालुक्यातील गावांसाठी 405 लक्ष तर अमळनेर मतदारसंघातीलच मात्र पारोळा तालुक्यातील गावांना देखील 105 लक्ष निधी मंजूर झाला आहे,याबाबत चा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. सदर कामात आमदार अनिल पाटील यांनी ग्रामिण भागातील महत्वपूर्ण कामांचा समावेश केला असून कोणताही भेदभाव न करता जास्तीतजास्त गावांना न्याय देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला आहे.सदर कामांना मंजुरी व निधीसाठी आमदारांनी पाठपुरावा केल्यानंतर संबधित विभागाने मागणीनुसार सर्वाधिक निधी मंजूर केल्याने आमदारांनी ग्रामविकास विभागाचे विशेष आभार मानले आहेत. आ अनिल पाटील यांच्या कार्यकाळात अनेक महिने कोरोना लॉकडाऊन मध्ये गेले असताना देखील त्यांनी शासनाकडून जास्तीतजास्त निधी मतदारसंघात खेचून आणल्याने सर्वत्र समाधानकारक कामे सुरू आहेत.आता पुन्हा कामे मंजूर झालेल्या गावातील ग्रामस्थांनी आमदारांचे विशेष आभार मानले आहेत.

अमळनेर तालुक्यात या गावांना मिळाली विकासकामे 

लोंढावे ता.अमळनेर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 20 लक्ष, पिंपळे खु. ता.अमळनेर संरक्षण भिंत बांधकाम रक्कम 10 लक्ष, जानवे ता.अमळनेर येथे गाव दरवाजा बांधकाम रक्कम 20 लक्ष, निसर्डी ता.अमळनेर येथे गाव दरवाजा बांधकाम रक्कम 15 लक्ष, खडके ता.अमळनेर येथे सांत्वन शेड बांधकाम रक्कम 10 लक्ष, रणाईचे ता.अमळनेर येथे श्रीकृष्ण मंदिर सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, कोंढावळ ता.अमळनेर येथे सांत्वन शेड बांधकाम रक्कम 10 लक्ष, रढावन ता.अमळनेर येथे विठ्ठल मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम रक्कम 20 लक्ष, शिरूड ता.अमळनेर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, वासरे ता.अमळनेर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, पाडसे ता. अमळनेर येथे रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 10 लक्ष, बोदर्डे ता.अमळनेर येथे गावांतर्गत रस्ते काँक्रीटीकरण रक्कम 10 लक्ष, मांडळ ता.अमळनेर येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व मोरी बांधकाम रक्कम 25 लक्ष, मांडळ ता.अमळनेर येथे म्हाळसादेवी येथे सभामंडप बांधकाम रक्कम 20 लक्ष, तळवाडे ता.अमळनेर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, हिंगोणे खु ता.अमळनेर येथे गाव दरवाजा बांधकाम रक्कम 15 लक्ष, हिंगोणे खु ता.अमळनेर येथे पेव्हर ब्लॉक/रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 10 लक्ष, निंभोरा ता.अमळनेर येथे स्मशानभूमी व सांत्वन शेड बांधकाम रक्कम 15 लक्ष, तासखेडा ता.अमळनेर येथे रस्ता काँक्रीटीकरण 10 लक्ष, आमोदे ता.अमळनेर येथे प्रवेशद्वार बांधकाम व चौक सुशोभिकरण रक्कम 15 लक्ष, दोधवद ता.अमळनेर येथे भोई समाजासाठी सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, धुपी ता.अमळनेर येथे गाव दरवाजा बांधकाम रक्कम 15 लक्ष, चौबरी ता.अमळनेर येथे रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 10लक्ष, लोण सिम ता.अमळनेर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, गांधली ता.अमळनेर येथे दत्त मंदिर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, मौजे पातोंडा ता.अमळनेर येथे सप्तश्रृंगी मंदिराजवळ ओटा बांधकाम व सुशोभीकरण रक्कम 10 लक्ष, गलवाडे खू ता. अमळनेर येथे सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, निमझरी त. अमळनेर येथे चौक सुशोभीकरण व कोंक्रिटीकरण रक्कम 15 लक्ष

पारोळा तालुक्यातील समाविष्ट गाव

बहादरपूर ता.पारोळा येथे भवानी नगर ते गिरधर पुंजू भोई रस्ता काँक्रीटीकरण रक्कम 15 लक्ष, दळवेल ता.पारोळा येथे गाव दरवाजा बांधकाम रक्कम 15 लक्ष, हिवरखेडा ता.पारोळा येथे गाव दरवाजा बांधकाम रक्कम 15 लक्ष, हिवरखेडा तांडा ता. पारोळा येथे रामदेव बाबा सभामंडप बांधकाम रक्कम 15 लक्ष, शिरसोदे ता.पारोळा येथे स्मशानभूमी सुशोभीकरण रक्कम 15 लक्ष, भिलाली ता.पारोळा येथे स्मशानभूमी व सांत्वन शेड बांधकाम रक्कम 15 लक्ष, मौजे शेवगे बु ता. पारोळा येथे स्मशानभूमी गेटसह वालकंपाऊंड बांधकाम रक्कम 15 लक्षाचे काम होणार आहे.

 

Protected Content