यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील परसाडे गावात झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीसह अन्य महत्वाचे ठराव संमत करण्यात आले.
तालुक्यातील परसाडे गावातील प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झालेली ग्रामसभा परिसरात होणारी अवैध दारूच्या विक्रीवर कायमची बंदी घालणे,महीला शौचालयाचे गंभीर प्रश्न, गावातील शाळा आवारात होणारी अस्वच्छता,ग्राम पंचायत कडून अनेक वर्षा पासुन न झालेली कर वसुली, विविध शासकीय योजना पासून आदीवासी बांधवांना मिळणार्या योजनांचा लाभाची माहिती देणे अशा विविध लोकहिता च्या मुद्यांवर ग्रामस्थांच्या मोठया उपस्थितीत सकारात्मक प्रतिसादाने गावातील प्रथम नागरीक सरपंच सौ मिना राजू तडवी यांच्या अध्यक्षते खाली अतिश्य सोर्हादपुर्ण वातावरणात ग्रामसभा पार पडली .
परसाडे तालुका यावल या आदिवासी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात गावातील प्रथम नागरिक ग्रामपंचायतच्या सरपंच सौ मिना राजु तडवी यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामस्थांच्या मोठया सहभागाने आयोजीत करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे उत्तर आणि आदीवासी बांधवांना मिळणार्या विविध शासकीय योजनाबद्दलची माहिती यावेळी ग्रामसेवक मजीत तडवी यांनी दिली.
ग्रामस्थानांच्या वतीने गावातील कार्यकर्ते युनुस तडवी व आदी गावकर्यांनी गावातील तरूणाचे आयुष्य परिसरातअवैद्य मार्गाने विक्री होणार्या घातक पन्नीची दारू व हातभट्टी गावठी दारूच्या आहारी जाणुन अनेकांचे आयुष्य उध्वस्त होतअसुन या दारू विक्रीचे धंदे कायमचे बंद करावे असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते संमत करण्यातआला.
या शिवाय गावातील नागरीकांना स्वस्त धान्य दुकानदारांकडुन वेळेवर किंवा शासनाकडून मिळणारे धान्य पुर्ण मिळत नसल्याची तक्रारी ग्रामस्थांनी सभेत उपस्थित केल्यात. तसेच गावातील महिला शौचालय नसल्याने महिलांना गावातील चारही बाजुस असलेल्या रस्त्यांच्या कडेला शौचास बसावे लागत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दहावर्षा पासुन गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातुन कर वसुली करण्यात आली नसल्याचे व आपल्या गावास तंटामुक्त करण्याच्या ठरावास यासह गावातील विविध प्रश्नांना ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
आपल्या गावाचा सर्वागीण विकास, विविध नागरी हिताच्या शासकीय योजना आपल्या पर्यंत पहोचणे हेच आपले ध्येय व संकल्प असल्याचे सांगुन यासाठी आपल्या सर्वांच्या सहभागा शिवाय हे शक्य नसल्याचे सरपंच सौ मिना राजु तडवी यांनी ग्रामसभेत अध्यक्षस्थानाहुन बोलतांना सांगितले. ग्रामसभेस उपसरपंच सुलेमान कान्हा तडवी,ग्राम पंचायत सदस्य शकीला महेमुद तडवी ,मदिना सुभेदार तडवी ,बाबासाहेब शंकर भालेराव ,खल्लोबाई युनुस तडवी, रमजान छबू तडवी, योगीता सतीश साळवे, श्रीमती मुन्नाबाई ईस्माइल तडवी उपस्थित होते . या ग्रामसभेची प्रस्तावना व उपस्थितांचे आभार ग्रामसेवक मजीत तडवी यांनी मानले.