मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । हक्काचं घर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. पण, गगनाला भिडलेल्या जागेच्या आणि घरांच्या किमतींमुळे प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. पण, आता तुमचं स्वप्न म्हाडा पूर्ण करणार आहे. आता म्हाडाच्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किमतींचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री सावे यांनी दिली आहे.
अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सरसकट नाहीतर म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्याच किमती कमी होणार असल्याचं अतुल सावे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. विक्री अभावी पडून असलेल्या घरांच्या किंमतीचा आढावा घेणार असून या घरांच्या किंमती कमी करून पुनर्विक्री करणार असल्याचंही यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं.
म्हाडाच्या सुमारे ११ हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्यानं म्हाडाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आल्याचंही यावेळी मंत्री सावे यांनी सांगितलं आहे. संबंधित घरांचं वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा तब्बल 11 हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करण्यात येणार असून नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले आहे.