पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पारोळा नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण बैठक आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
याबैठकीत शहरात होत असलेला अशुद्ध पाणीपुरवठा, आरोग्याबाबतचे कामकाज, शहराची हद्दवाढ, स्वच्छतेसंदर्भात नगरपरिषदेकडुन नागरीकांना उद्भवणाऱ्या समस्या यांचेसह अनेक महत्वाचा विषयांवर आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे नगरपरिषदेकडुन नागरी समस्यांना दिरंगाई झाली तर कुठल्याही अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा सुचना देखील यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यासोबत शहराचा हद्दवाढी बाबत तातडीने त्रुट्यांचा पुर्ततेसह प्रस्ताव तयार करा, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचा घर मिळवुन देण्यासाठी प्रस्ताव तयार करा, दैनंदिन बाजार पेठेत होत असलेली वाहतुक कोंडी टाळण्यासाठी ठोस नियोजन करा, नागरीकांसह बालकांना आरोग्य विषयक समस्या उद्भवु नयेत यासाठी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नाले सफाई यावर अधिक भर द्या अशा सुचना यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
याप्रसंगी तहसिलदार अनिल गवांदे, मुख्याधिकारी ज्योती भगत, शहरप्रमुख बापु मिस्तरी, नगरसेवक राजु कासार, उपशहरप्रमुख भुषण भोई, सिध्दार्थ जावळे यांचेसह नगरपरिषदेच्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.