भुसावळात महाराणा प्रताप विद्यालयाच्या गणेशाचे उत्साहात विसर्जन (व्हिडीओ)

maharana

भुसावळ प्रतिनिधी । येथील संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालयात सालाबादप्रमाणे यंदा ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत पाच दिवसांच्या मुक्कामी आलेल्या गणरायाचे आज दि.6 सप्टेंबर रोजी विसर्जन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दरवर्षाप्रमाणे बाप्पाची आरास ही देशभक्तीपर असते. पंरतु यंदा ‘आदिवासी क्रांतीकारकांचे सहस्त्र लढ्यात बलिदान’ याविषयावर आरास करण्यात आली होती. तसेच भारतीय संस्कृतीला साजेशी अशी बाप्पाची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वत: ढोल-ताशे वाजवले. काही विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत मिरवणूकीत सहभाग घेतला. या मिरवणूकीत शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत लेझीमवर ठेका धरला होता. यामुळे ही मिरवणूक नागरिकांचे आकर्षण ठरली होती.

Protected Content