Home Cities जळगाव काशीबाई उखाजी कोल्हे शाळेत अनोखा वाढदिवस साजरा

काशीबाई उखाजी कोल्हे शाळेत अनोखा वाढदिवस साजरा

0
121


kolhe school

जळगाव प्रतिनिधी । येथील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेतील उपशिक्षक किशोर घुले यांची कन्या तेजस्विनीचा आज दि. 6 सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक आणि वह्या वाटप करत मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिशा चौधरी, वैष्णवी पाटिल, प्रांजल सोनवणे, तनवी रेवस्कर, धनश्री कुडी, चेतन सोनवणे, सचिन सोनवणे, साई खैरनार, निलेश बिरारी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका जे.आर. गोसावी, उपमुख्याध्यापक ए.व्ही. ठोसर, वैष्णवी पाटील, संध्या घुले उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound