बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरानजीक असलेल्या बांभोरी जवळील गिरणानदीवर असलेल्या पुल कम बंधाऱ्याचे काम त्वरीत पुर्ण करावी या मागणीचे निवेदन बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सोमवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता देण्यात आले.
बांभोरी पुल कम बंधारा कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांभोरीजवळील गिरणानदीवर पुल कम बंधाऱ्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता असल्याने त्या कामासाठी ४० कोटीच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार गिरणानदीपवर पूल कम बंधाऱ्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे, कामासंदर्भात शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तीन निविदा स्विकारण्यात आले असून त्या निविदा कोणत्या प्रशासकीय व तांत्रिक आधारावर काढण्यात आली याचा तपसील देण्यात यावा, शिवाय या पुलाच्या बांधकामाला कुणाची मंजूरी आहे याचा खुलासा देण्यात यावा त्यामुळे तातडीने या पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर बांभोरी पूल कम बंधारा कृती समितीचे सदस्य सुशील नवाल, विष्णू भंगाळे, सरीता माळी-कोल्हे, ॲड. जमील देशपांडे, अनंत जोशी, फारूख शेख, आशुतोष पटेल, ललीत शर्मा यांच्यासह आदी उपस्थित होते.