अवैध रेल्वे तिकिट विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त

भुसावळ प्रतिनिधी । लॉकडाऊनमध्ये सुरू असणार्‍या विशेष रेल्वे गाड्यांच्या तिकिट विक्रीत काळाबाजार करणार्‍या तब्बल ४४ दलालांना रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली आहे.

लॉकडाऊन सुरू असतांना दुसरीकडे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी १२ मे पासून १५ वातानुकूलित विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यानंतर १ जूनपासून निवडक १०० विशेष मेल/एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येत आहेत. यात तिकिट मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची संधी दलालांनी साधल्याची माहिती समोर आली होती. वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढून आरक्षित तिकीटांची चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने धडक मोहिम राबवत मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांवरील वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली. यात तब्बल ४४ दलालांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून आठ लाख रूपयांपेक्षा जास्त मूल्ये असणारी तिकिटे देखील जप्त करण्यात आली आहेत.

Protected Content