मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाजवळ गेल्या चार ते पाच दिवसापुर्वी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोठे डंपर मधून अवैधरित्या मुरूम वाहतूक सुरू असल्याचे एका जागरूक नागरिकाच्या निदर्शनास आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पाच डंपर आणि पोकलेन मशीन रात्रीच्या अंधारात मुरूम उत्खनन आणि वाहतूक करत होते, मात्र हे काम कोणाच्या नजरेस न येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते. मुक्ताईनगर तालुक्यात ” रात्रीस खेळ चाले ” हे प्रकार सर्रास सुरू आहेत.
घटनास्थळी आलेल्या नागरिकाने तत्काळ तहसीलदार , पोलीस स्टेशन आणि स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. नागरिकाच्या मते, पाच डंपर हे विनानंबरचे होते. नंतर त्या ठिकाणी महसूल व पोलिस कर्मचारी आले आणि त्यांनी ते मुरूमाने भरलेले ते डंपर मुक्ताईनगर येथील शासकीय धान्य गोडाऊनमध्ये उभे केले. मात्र पोकलेन मशीन नव्हत्या. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी याविषयी तहसीलदार यांच्याशी तहसील कार्यालय मध्ये भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझी व्ही सी चालू आहे असे सांगून पत्रकारांना माहिती देण्यास टाळले. नंतर दुपारी मुक्ताईनगर येथील धान्य गोडाऊनच्या जागेमध्ये लावण्यात आलेले ते डंपर तेथून गायब करण्यात आले. तहसीलदार माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून यामागे गोडबंगाल काय ते डंपर कोणत्या कामावर मुरूम घेऊन जात होते का किंवा त्यांच्याजवळ काही शासकीय रॉयल्टी होती का असे असले तरी मध्यरात्री मुरूम वाहने हे एक शंकास्पद आहे.
दोन वेळा सदरची माहिती विचारण्यासाठी पत्रकार मुक्ताईनगर चे तहसीलदार गिरीश वखारे यांच्या दालना जवळ गेले असता त्यांना सांगण्यात आले बैठक सुरू आहे, व्ही सी सुरू आहे असे सांगून त्यांनी पत्रकारांना माहिती देणे टाळले तसेच याच वेळेस पत्रकारांच्या समोर तहसीलदारांचे दालनामध्ये खुलेआम काही राजकीय पदाधिकारी ,शेतकरी आपल्या तक्रारी घेऊन जात होते त्यांच्यासाठी तहसीलदारांकडे वेळ होता परंतु पत्रकारांना माहिती देण्यास तहसीलदारांकडे वेळ नव्हता यामागील कारण काय असू शकते हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पकडण्यात आलेल्या डंपर विषयी दोन वेळा तहसीलदारांना माहिती विचारण्यासाठी गेल्यानंतरही तहसीलदारांनी माहिती न दिल्याने पत्रकारांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेत मी तहसीलदारांना तुम्हाला फोन करायला सांगतो असे सांगितले परंतु तहसीलदारांचा फोन आलाच नाही. म्हणजे तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावले असे दिसून येते. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिक आणि पत्रकारांमध्ये असंतोष पसरला आहे. यामागे काही राजकीय वरदहस्त असल्याचा संशय बळकावत आहे.