मी पुन्हा येईन – रहाणे

rahane 1

 

मुंबई प्रतिनिधी । “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” ! हे वाक्य महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी प्रचार करताना आपल्या भाषणात म्हटलं होते. मात्र, त्या वाक्यावरून ते सगळीकडे ट्रोल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आता असंच काहीतरी मराठमोळा क्रिकेटपटू आणि कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनं म्हटलं आहे.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. त्याआधी कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने पत्रकारांशी संवाद साधला. फॉर्ममध्ये नसल्यानं त्याच्यावर टीका केली जात होती. मात्र, विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्यानं पुनरागमन केलं. कसोटीत आपलं स्थान टिकवणाऱा अजिंक्य रहाणे एकदिवसीय संघात मात्र जागा मिळवू शकलेला नाही. त्यामुळेच पत्रकारांशी बोलताना त्याने मी एकदिवसीय संघात नक्कीच पुनरागमन करेन असे म्हटले आहे.

रहाणे म्हणाला की, कसोटी सामन्यात मला चांगले खेळायचे आहे. चांगला खेळ करत रहायचं असून मला विश्वास आहे मी एकदिवसीय संघात पुनरागमन करेन. तुमचा स्वत:वर किती विश्वास आहे यावर सर्व अवलंबून असते. तुम्ही वर्तमानात रहायला हवे. कसोटीत माझी कामगिरी उंचावली आणि संघाच्या विजयात त्याचा वाटा असेल तर एकदिवसीय संघात पुनरागमनं नक्की करेनं असेही अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.

Protected Content