भुसावळ औष्णिक विद्यूत केंद्रातील ६६० मेगावॅट प्रकल्पात सुरक्षेबाबत महाजेनकोच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ६६० मेगावॅटनवीन प्रकल्पामध्ये वारंवार घडत असलेले अपघात आणि औद्योगिक असुरक्षितेबाबतीत लाईव्ह ट्रेंड्स न्युजने वेळोवेळी प्रसारमाध्यमातून बातम्या प्रदर्शित करून सुद्धा महाजेनको प्रशासनाने कुठलीही ठोस कार्यवाही आजपर्यंत केलेली नाही. याउलट महाजेनको प्रशासन आणि मे.भेल प्रशासन सदर बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून येत आहे.

लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या प्रतिनिधींनी भेल कंपनीचे प्रकल्प संचालक जावडे आणि औद्योगिक सुरक्षा अधिकारी संजीव हेडाऊ यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून सुद्धा त्यांच्याकडून औद्योगिक सुरक्षेच्या बाबत कुठलीही माहिती दिली जात नसून सदर माहिती ६६० मेगावॅट प्रकल्पाचे मुख्य नियोक्ता म्हणजे महाजेनको प्रशासनाकडून घेण्याचे त्यांच्याकडून सांगितलें जात आहे.तसेच संजीव हेडाऊ हे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी खूप अर्वाच्य भाषेत बोलतात आणि त्यांना खूप हीन वागणूक देतात.

यावरून असे दिसून येते की, मे.भेलच्या अधिपत्याखाली दीपनगर येथील ६६० मेगावॅट नविन प्रकल्प उभारणीसाठी कार्यरत असलेल्या विविध १५ कंपन्यांमध्ये महाराष्ट्र कारखाना अधिनियमानुसार एकही प्रमाणित सुरक्षा अधिकारी कार्यरत नाही.सदर बाबतीत माहिती अधिकारांतर्गत माहिती महाजेनको प्रशासनास मागितली असता सदर माहिती महाजेनको प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे लेखी स्वरूपात मिळाले.

शासनाकडून करोडो रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात अशी माहिती मुख्य नियोक्ता यांचेकडे उपलब्ध नसणे ही फार मोठी चिंतेची बाब आहे.बिना औद्योगिक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अश्या रितीने पूर्ण झालेल्या नविन प्रकल्पात भविष्यात फार मोठे अपघात होऊन खूप मोठी जिवीतहानी होण्याची शंकाच रहात नाही.सदर प्रकरणाची तक्रार राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे का करू नये?

लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या प्रतिनिधींनी असुरक्षितपणे सुरू असलेल्या नविन प्रकल्पातील कामांचे छायाचित्रे तसेच व्हिडिओ वेळोवेळी मे.भेल कंपनीचे प्रकल्प संचालक जावडे , औद्योगिक सुरक्षा अधिकारी संजीव हेडाऊ आणि महाजेनको चे औद्योगिक सुरक्षा अधिकारी महेश फेगडे यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून देऊन सुद्धा मे.भेल आणि महाजेनको प्रशासनाकडून काडीमात्र कार्यवाही होत नाही.दि.21/11/2024 रोजी संध्याकाळी में.भेलचे औद्योगिक सुरक्षा अधिकारी रोहित्र उभारणी ठिकाणी अल्फा कंपनीच्या वरिष्ठांशी ज्यांनी कोणतेही सुरक्षा साधनें परिधान केलेली नाही त्यांच्याशी गप्पा मारत असताना दिसत असून आजूबाजूला सुद्धा असुरक्षितरित्या व बेजबाबदारपणे कामे सुरू असून कामगारांचा वावर दिसून येत आहे.

एकंदरीत विचार केला असता असे निदर्शनास येते की, महाजेनको प्रशासनाच्या भु.औ.वि.केंद्राच्या नविन प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकारी आणि मे.भेल कंपनी मधील मोठ्या व्यैयक्तिक आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणास्तव महाजेनको प्रशासनाकडून मे.भेल कंपनीवर कुठलीही कार्यवाही होत नाही व “तेरी भी चूप मेरी भी चूप “असे समीकरण पहायला मिळत आहे.लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या माध्यमातून शासनाकडे तसेच महाजेनकोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे मागणी करत आहोत की व्यैयक्तिक आर्थिक स्वार्थापोटी शासनाच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषी मे.भेल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या आणि नविन प्रकल्पाच्या उभारणीठिकाणी अपघातांना व जिवीतहानीस कारणीभूत दिपनगर येथील 1X660 मे.वॅ.प्रकल्पाचे मुख्य अभियंता शशांक चव्हाण,उपमुख्य अभियंता संतोष वकारे, औद्योगिक सुरक्षा अधिकारी महेश फेगडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कार्यवाही करावी.तसेच येत्या काही दिवसांमध्ये लाईव्ह ट्रेंड्स न्युजच्या माध्यमातून अशा प्रकारची अनेक प्रकरणे समोर येणार असून महाजेनको प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची आशा आहे.

Protected Content