मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजप नेते मोहित कंबोर यांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना त्यांना खुले आव्हान दिले आहे.
भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी काल भास्कर जाधव यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दांमध्ये टिका केली होती. जाधव यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या गटात सामील होण्यासाठी १०० कॉल केले होते असा आरोप केला होता. मोहित कंबोज यांच्या आरोपांना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आज विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भास्कर जाधव म्हणाले, ’राज्यातील सभ्यपणाचं राजकारण संपत चाललं आहे. व्यक्तीगत कोणी बोलू नये असं माझं मत आहे’. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चांगलं नेतृत्व म्हणून पाहत होतो. परंतु ते भयंकर सुडाचे राजकारण करणारी व्यक्ती आहेत. वास्तविक असे आरोप होतात, त्या व्यक्तीने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
दरम्यान, भास्कर जाधव पुढे म्हणाले की, मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांचं फ्रंट मँन म्हणून काम करतात. त्यांनी आरोप केले की शिंदे यांच्या पक्षात घेण्यासाठी पत्र लिहिलं होतं. १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एक तरी आरोप सिद्ध करावा. आता मी येथे अभिमानाने काम करतो आहे. त्यामुळे मोहित कंबोज आणि त्याला काम सांगणारे अनाजी पंत यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावे. मला सभागृहात बोलून देत नाही या सत्ताधार्यांना माहित आहे की मी सभागृहात बोलायला लागलो तर काय काय बोलेन. जर मला सभागृहात संधी मिळाली नाही तर मी तुमच्यासमोर येऊन बोलेन. मी यांना घाबरणार नाही. कोण आहे हा मोहित कंबोज ही पाळलेली भटकी कुत्री आहेत. माझ्याकडे नीतिमत्ता आहे, अशी घणाघाती टिका भास्कर जाधव यांनी केली.