जळगाव प्रतिनिधी । आपण केलेल्या तक्रारीवर पक्षाने कारवाई न केल्यास व सातत्याने डावलणे न सोडल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागणार असल्याचे सूचक उदगार आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काढले. ते कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
एकनाथराव खडसे यांनी कोअर समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपण पक्षाकडे तक्रार केली असून यावर कार्यवाही अपेक्षीत आहे. मात्र पक्ष सातत्याने मला डावलत आहे. अगदी उत्तर महाराष्ट्रातदेखील कार्यक्रमांना बोलावले जात नाही. यामुळे असेच सुरू राहिल्यास आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असे ते म्हणाले. अर्थात, वेगळा मार्ग निवडतांना पक्षाला सांगूनच आपण वाटचाल करू अशी पुस्ती जोडण्यास ते विसरले नाहीत.
पहा : खालील व्हिडीओत पहा एकनाथराव खडसे नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/471800063524397