गरज वाटल्यास मायावती आंबेडकर नगरातून निवडणूक लढणार

169599 mayavati

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आज आंबेडकर नगर येथील प्रचार सभेत जाहीर केले की, लोकसभा निवडणुकीनंतर गरज भासल्यास आपण आंबेडकर नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू शकतो.

 

 

प्रचारसभेच्या ठिकाणी मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यासंदर्भात मायावती म्हणाल्या की, या निवडणुकीत नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून ‘जय भीम’ वाले येणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर गरज भासल्यास आपण आंबेडकर नगरमधून लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असेही मायावती यांनी सांगितले. मात्र पंतप्रधानपदासाठी आपण इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. सर्वकाही ठीक झाले तरच मी इथून निवडणूक लढवणार आहे. कारण दिल्लीच्या राजकारणाचा मार्ग आंबेडकर नगरमधूनच जातो असेही त्यांनी नमूद केले. मायावतींनी लोकसभा निवडणूकीपूर्वीच सांगितले होते की, मी निवडणूक लढणार नाही, मात्र निवडणूकीचे वातावरण पाहून मायावतीना पून्हा निवडणूक लढण्याची इच्छा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याविषयावर त्या पुन्हा निर्णय घेण्याची चिन्हे दिसत आहेत.

Add Comment

Protected Content