नागपूर वृत्तसंस्था । भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याची चर्चा असतांना खडसे यांनी भाजप पक्षामध्येच राहणार असल्याचे स्पष्ट वक्तव्य केले आहे. आता खडसे नागपूर येथे असून ते लवकरच मुख्यमंत्री व पवार यांना भेटणार आहेत.
भगवानगडावरील त्यांच्या भाषणानंतर नाराज एकनाथ खडसे हे भाजप सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. पण खडसे यांनी भाजप पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केलेय. कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे आपले मन वळवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितेलय. पण हे सांगत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आपण भेट घेणार असल्याचेही यावेळी एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. पण ही राजकीय भेट नसल्याचेही त्यांनी सांगितले. एकनाथ खडसे नाराज आहेत, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.