रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जलयुक्त शिवार योजनेच्या समितीची बैठक आयोजित करणे नवीन कामे संबधित विभागांना प्रस्तावीत करायला लावणे त्यांच्याकडून कामे करून घेणे हीच माझी जबाबदारी होती. कुठल्याही जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामांच्या बिलांवर मला सही करण्याचे अधिकार नव्हते. त्यामुळे माझा या योजनेशी फारसा संबध नव्हता. असे तात्कालिन जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्ष तथा तत्कालिन प्रांतधिकारी अजित थोरबोले यांनी सांगितले.
रावेर तालुक्यात २०१७ ते २०१९ दरम्यान जलयुक्त शिवार योजनेची कामे निकृष्ट झाल्याची ओरड असून आ शिरीष चौधरी यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नदेखील केला आहे. त्यामुळे ही योजना चौकशीच्या फे-यात आहे. यावर थोरबोले पुढे म्हणाले की, “त्यावेळेस जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष म्हणून मला बैठक आयोजित करणे आणि संबधित विभागा कडून कामे करून घेणे हीच माझी जबाबदारी होती. या कामांचा लेखाजोखा ठेवण्याची जबाबदारी त्यावेळचे तालुका कृषी अधिकारी यांची होती. ते जलयुक्त शिवार योजनेचे सदस्य सचिव होते. त्यामुळे या योजनेशी माझा फारसा संबध नव्हता असे त्यांनी सांगितले.