मी आधीच मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय : भुजबळ

नगर-वृत्तसेवा | आपल्याला कुणी मंत्रीपदावरून टोला मारू नये, कारण अंबड येथील ओबीसी रॅलीच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला असल्याचा गौप्यस्फोट आज मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे यांना टार्गेट केले. आज नगर येथील ओबीसी मेळाव्यात बोलतांना त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, हातात कागद घेतला अन् म्हणाले अध्यादेश आलाल. लेकाला अध्यादेश आणि नोटिफिकेशनला मसुदा म्हणजे काय माहित नाही. आज चार दिवस झाले राज्यात उन्माद सुरु आहे. ओबीसी लोकांच्या घरासमोर शिविगाळ सुरु आहे. मी आताही सांगतो मराठा समाजाला माझा विरोध नाही, त्यांना आरक्षण मिळालं पाहीजे असं म्हणणारे आम्ही आहोत. पण ते वेगळं द्या. आमच्या ताटातील देऊ नका, असे छगन भुजबळ म्हणाले.

दरम्यान, आपल्याला मंत्रीपदाचा मोह नाही. १७ नोव्हेंबर रोजी अंबड येथील पहिली ओबीसी रॅली होण्याच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केलेला आहे. यामुळे मला कुणी लाथा मारून मंत्रीमंडळाच्या बाहेर काढू शकत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

Protected Content