मी शिवरायांच्या चरणांवर हजार वेळा डोके ठेवायला तयार – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यानंतर आता राज्य सरकारने या प्रकरणी नौदलासह संयुक्त समितीची स्थापना केली आहे. त्याविषयी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण शिवाजी महाराजांच्या चरणी शंभरदा डोकं ठेवायला तयार असल्याचं म्हटलं.

“शिवाजी महाराज आपले दैवत आहे, आपली अस्मिता आहे. यावर राजकारण करू नये. ते माफीची मागणी करत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर एकदा नाही, शंभरवेळा डोके ठेवायला मी तयार आहे. मला त्यात कमीपणा वाटणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य आहेत,” असे शिंदे म्हणाले. तसेच छत्रपतींचा रुबाबदार असा पुतळा उभा राहण्यासाठी विधायक असं काय करता येईल हे विरोधकांनी सांगायला हवे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी 29 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यात सर्व अधिकारी आणि नौदलाचे अधिकारीही उपस्थित होते.

Protected Content