प्रतापगड (प्रतिनिधी) मला पाडण्याचे कारस्थान रचले जातेय आहे. त्यासाठी माझ्या विरोधात काँग्रेस खोटा प्रचार करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. प्रतापगडमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली.
प्रतापगडमध्ये सभेला संबोधित करतांना मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसला मला संपवायचे आहे. त्यासाठी ते कारस्थानंही रचत आहेत. पण माझी ५० वर्षांची तपस्या खरंच इतक्या सहजासहजी संपवणे शक्य होणार नाही. मी ५० वर्षं अविरतपणे काम केले आहे. न थकता ,न थांबता देशासाठी झटलो आहे. तेव्हा मी स्वत:ही पडणार नाही आणि पक्षालाही पडू देणार नाही.’ असेही मोदींनी सांगितले. तसेच काँग्रेसचे संपूर्ण लक्ष माझी प्रतिमा खराब करण्यावर आहे असा आरोपही मोदींनी केला.