नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार आता थकले आहेत, त्यांनी विश्रांती घ्यावी या अजित पवारांच्या वक्तव्याला आज पवार साहेबांना नाशिकमधून जोरदार उत्तर दिले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक जिल्हा दौर्यावर असून येथील पत्रकार परिषदेत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. दौर्याची सुरुवात नाशिकमधूनच का केली असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिक आघाडीवर होतं. कॉंग्रेस पक्षाच्या इतिहासात नाशिकला अधिवेशन झालं, हे विसरुन चालणार नाही.
अजित पवारांनी उपस्थित केलेल्या वयाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी भाष्य केलं. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचं वाक्य उच्चारत शरद पवार म्हणाले की, ना टायर्ड हूँ.. ना रिटायर्ड हूँ.. मैं तो फायर हूँ! असं म्हणून पवारांनी त्यांना उत्तर दिले.
शरद पवार म्हणाले, सुप्रिया सुळे यांनी पक्षात काम करावे, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. मग, सुप्रिया सुळे राज्यसभेत गेल्या. दोन वर्षांनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताने सुप्रिया सुळे विजयी झाल्या. आता सुप्रिया सुळे यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे.