नागपूर येथे सरन्यायाधीश बोबडे यांचा जाहिर सत्कार

sharad bobade

नागपूर वृत्तसंस्था । देशाचे ४७ वे सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांचा नागपूर हायकोर्ट बार असोसिएशन आणि इतर वकील संघटनांच्या वतीने येत्या दि. १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता जाहिर सत्कार करण्यात येणार आहे.

देशाचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती आर.एम.लोढा यांच्याहस्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखाली हा भावपूर्ण सोहळा होणार असल्याची माहिती हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरी वेंकटरमन यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. न्या. शरद बोबडे हे मूळचे नागपूरकर असून येथील हायकोर्टाच्या प्रांगणात (दि.१४) त्यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रीम कोर्टातील न्या. भूषण गवई राहणार आहेत. सुप्रीम कोर्टातील सेवानिवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, मुंबई हायकोर्टातील मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग, नागपूर खंडपीठातील वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश रवी देशपांडे उपस्थित राहतील.

Protected Content