
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसने त्यांना पाठिंबा द्यावा,अशी विनंती दलवाई यांनी या पत्रात केली आहे.
दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे की, प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना काँग्रेसने जेव्हा राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली होती, तेव्हा शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत खूप फरक आहे. त्यांचे राजकारण आता सर्वसमावेशक झाले आहे. त्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देण्यास हरकत नाही. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा, असेही दलवाई यांनी पत्रात म्हटले आहे.