वेळेवर नाश्ता न बनवल्यामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घरी पत्नीने नाश्ता न बनवल्याने पतीन तिच्या डोक्यात हातोडा मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. त्यानंतर पती एवढयावरच थांबला नाही तर त्यांने पत्नीवर चाकू आणि स्क्रू ड्रायव्हरने ही हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी गंभीररित्या जखमी झाली होती. ही घटना कुर्ला येथे घडली आहे. हल्ल्यानंतर महिलेला भा.भा. रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात असून तिच्यावर उपचार सुरू आहे. गुडिया असे जखमी महिलेचे नाव असून तिचे वय ३४ वर्ष आहे. आरोपी पतीविरोधात कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ३८ वर्षीय मोहम्मद फय्युम खान असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिला गुडिया ही कुर्ला येथील गणेश बाग लेन येथे पतीसोबत वास्तव्याला आहे. ९ मे रोजी गुरूवारी गुडिया हिने नाश्ता वेळेवर बनला नाही. त्यामुळे पती तिच्यावर चिडला आणि पत्नीसोबत वाद घालत होता. वाद वाढल्यानंतर पतीने संतापच्या भरात घरात ठेवलेला हातोडा उचलून पत्नी गुडिया हिच्या डोक्यात मारला. यानंतर एवढयावरच न थांबता त्यांने घरातील चाकूने पत्नीच्या गळयावर तीन वार केले आणि घरातील स्कू ड्रायव्हरनेही पत्नीच्या डोक्यावर मारले. यात गुडिया जखमी झाली. हल्ल्यात जखमी झालेल्या गुडिया यांना तात्काळ कुर्ला येथील भा.भा. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी गुडिया खान हिचा जबाब नोंदवला. या जबाबात तिने पतीने आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर हत्येच्या प्रयत्न व धमकावल्याप्रकरणी पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Protected Content