Home Cities एरंडोल भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी


एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल रस्त्यावरील भालगाव फाट्याजवळ एका अज्ञात टँकर चालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती, पत्नी आणि त्यांचा एक मित्र असे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, किरण ओंकार पाटील रा. थोरगव्हाण ता. एरंडोल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. गुरूवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मित्रासह दुचाकीने (एमएच १९ ईएच ६२४२) जात असताना, मागून येणाऱ्या टँकर (जीजे ३९ टीए ९९८७) चालकाने त्यांना जोराची धडक दिली. टँकर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात चालवल्याने हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून तिन्ही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ मुकेश आमोदकर तपास करत आहेत.


Protected Content

Play sound