यावल तालुक्यात शाळापुर्व तयारी मेळाव्यांना मोठा प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज पासुन राज्यातील शाळांमध्ये शाळापुर्व तयारी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असुन,यावल तालुक्यातील सुरू झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहील्याच दिवशी जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थितीती ही लक्ष वेधणारी ठरली, यावेळी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी गुलाबपुष्प देवुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावल तालुक्यात जिल्हा परिषदच्या एकुण १४० शाळा असून ४५२ ही शिक्षकांची संख्या आहे.

१५ जुन पासुन २०२४ च्या शैक्षणीक सत्राला सुरूवात झाली असुन, यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत तालुक्यातील २२ शाळांमध्ये शाळापुर्व तयारी संदर्भात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निमगाव तालुका यावल येथील जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येऊन गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके व मुख्याध्यापक अय्युब तडवी, त्याचप्रमाणे अंजाळे तालुका यावल येथील जिल्हा परिषद शाळाच्या मुख्याध्यापिका रत्नमाला चौधरी यांचा हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्य देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना पोषण आहार आणी शालय पुस्तके वाटप करण्यात आली.

यावल तालुक्यातील ४४ जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये शाळापुर्व तयारीचे मेळावे आयोजीत करण्यात आली. या उपक्रमात गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली केन्द्र प्रमुख यांची महमंद तडवी, सांगवी कन्या शाळा व कठोरा शाळा, सैय्यद मुक्तार अली फैजपुर कन्या शाळा व मारूळ कन्या शाळा, लतिका पाटील पाडळसा शाळा व कासवे, कविता गोहील डांभुर्णी शाळा व कोळन्हावी, प्रमोद सोनार आडगाव शाळा व नायगाव शाळा, विनय ठाकुर दहिगाव शाळा व सावखेडा सिमशाळा, शाकीर शेख विरावली व यावल कन्या शाळा, किशोर चौधरी साकळी कन्या शाळा व शिरसाड, गिरीष सपकाळे बोरावल बु. व राजोरा शाळा, सलीम तडवी बामणोद शाळा व चिखली बु,ललीत महाजन हिंगोणे शाळा व न्हावी बॉयज शाळा, विजय वरटकर चिखली शाळा व म्हैसवाडी शाळा, संदीप मांडवलकर हरिपुरा शाळा व पांढरी वस्ती शाळा, सिमा सातघरे हिंगोणे कन्या शाळा व हंबर्डी शाळा, राहुल पाटील चिंचोली शाळा व वाघोदा शाळा, नितिन पाटील भालशिव व टाकरखेडा शाळा, दिनेश सोनवणे वाघझीरा व मानापुरी शाळा, भास्कर पाटील डोणगाव, प्रशांत पाटील सातोद व वड्री शाळा, प्रशांत सोनवणे चितोडा व सांगवी शाळा, विनोद बोरसे किनगाव व मालोद शाळासाठी यांनी शाळापुर्व तयारीच्या मेळाव्यांसाठी भेट अधिकारी सहभाग घेतला.

Protected Content