जळगाव प्रातिनिधी । माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता बारावीची परीक्षा दि. २१ पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील ७१ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असुन ५१ हजार ५७२ विद्यार्थी परीक्षा देणार आहे.
बारावीची परीक्षा उद्या दि. २१ ते २० मार्च तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडुन आवश्यक ती तयारी पुर्ण करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांकडुनही परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. बारावीची परीक्षा ७१ केंद्रावर होणार असुन ५१ हजार ५७२ विद्यार्थी निश्चीत करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी १७ परिरक्षक केंद्र असुन याठिकाणी प्रश्नसंच ठेवले जाणार आहे. शिक्षण विभागाने कॉप्या रोखण्यासाठी ६ भरारी पथके नेमली आहे. विद्यार्थी कॉपी करतांना आढळुन आल्यास आता विद्यार्थ्यासोबत पर्यवेक्षकावरही कारवाई केली जाणार आहे.