पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असून यात यंदा देखील मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले आहे.
बारावी परीक्षा ४ मार्च २०२२ ते ३० मार्च २०२२ या कालावधीत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के लागला आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या परीक्षेबाबतही साशंकता होती. मात्र, यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने यंदा मार्च-एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली. दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल. राज्य मंडळाचे सचिव माणिक बांगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. परिक्षेत मुली: ९५.३५ तर मुले ९३.२९ इतकी उत्तीर्ण झाली आहेत. सर्वात जास्त निकाल कोकणचा तर सर्वात कमी हा मुंबईचा लागला. विभागवार निकाल खालीलप्रमाणे आहे.
कोकण विभाग: ९७.२१ टक्के
पुणे: ९३.६१
नागपूर: ९६.५२
औरंगाबाद: ९४.९७
मुंबई: ९०.९१
कोल्हापूर: ९५.०७
अमरावती: ९६.३४
नाशिक: ९५.०३
लातूर: ९५.२५
एकूण: ९४.२२