जळगाव,प्रतिनिधी | घरकुल घोटाळ्यातील ‘त्या’ दोषी पाच नगरसेवकांना आज मनपा प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजवली आहे. यात त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
घरकुल घोटाळ्यात दोषी ठरलेल्यांमध्ये विद्यमान भाजपा गटनेते भगत बालाणी, नगरसेवक लता भोईटे, दत्तात्रेय कोळी, सदाशिव ढेकळे आणि कैलास सोनवणे यांचा समावेश आहे. कारणे दाखवा नोटीसमध्ये त्यांना १४ दिवसात म्हणजेच १७ डिसेंबरपर्यत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली आहे. दरम्यान, घरकुल घोटाळ्यात शिक्षा झालेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यास असमर्थ ठरलेल्या मनपा आयुक्त उदय टेकाळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे ईमेलद्वारे केली होती. यानंतर या कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.