पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा नगर पालिका प्रशासनातर्फे एकत्रित टॅक्सच्या आकारणी संदर्भात पाचोरा नगर पालिका क्षेत्रातील सर्वच करधारकांना नोटीसा बजावणीचे काम सुरु आहे. नियमित भरत असतील अशा करधारकांना एकत्रित कर वाढीची सूट द्यावी अशी मागणी पत्रकार संदिप महाजन यांनी केली आहे.
पाचोरा नगर पालिका प्रशासनातर्फे नियमानुसार चतुर्थ फेर आकारणी (एकत्रीत टॅक्स आकारणी) करण्यात येते. यावर्षी देखील सन – २०२० ते २०२४ करीता एकत्रीत टॅक्सची आकारणी संदर्भात पाचोरा नगर पालिका क्षेत्रातील सर्वच कर धारकांना नोटीसा बजावणीचे काम सुरु असुन दि. १७ डिसेंबर २०२१ पावेतो हरकत देखील मागवण्यात येत आहे.
पाचोरा नगर पालिका सभागृहातील सर्व पक्षीय सदस्यांना नियमीत कर देणार्या करदात्यांतर्फे गेल्या अडीच वर्षाचा कोरोना काळात सर्वच स्थरातील जनतेला कमी – अधिक प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा स्थितीत आणखी या एकत्रित टॅक्स वाढीचा फटका बसणे योग्य नाही तरी वरील सर्व बाबींचा विचार करून सरसकट सर्व टॅक्स (वाढीव कर) माफ करण्यात यावा. किंवा जे लोक नगर पालिका प्रशासनाचा कर नियमित भरत असतील अशा करधारकांना किमान सन २०२० ते २०२४ या कालावधीत एकत्रीत कर वाढीची सूट दिली तर शहरवासीयांनी दिलासा मिळेल त्याचबरोबर नियमीत कर भरला तर त्याचा फायदा- नुकसान काय होतो ? याचाही अनुभव थकीत व नियमीत करदात्यांना येईल. याबाबत प्रत्येक करदात्याने आपल्या प्रभागाचे नगरसेवक व राजकीय पुढारी यांना देखील यात लक्ष केंद्रीत करुन पुढाकार घ्यावा अशी मागणी ध्येय करियर अकॅडमीचे संचालक तथा पत्रकार संदिप महाजन यांनी सोशल मिडियाद्वारे केली आहे.