पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील एक घर पावसामुळे पडून याखाली सहा जण जखमी झाल्याची घटना आज घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथे कालच्या पावसामुळे शेतात काम नसल्यामुळे बहुतांश लोक घरीच होते. यातच गावातील वाल्मीक पाटील यांचे मातीचे घर अचानक पडले. यामुळे घरात असणारे कल्पनाबाई पाटील (वय४९); कविता पाटील (वय२४); सागर पाटील (वय१६); ललीत पाटील (२०); वाल्मीक पाटील (२२) आणि छबाबाई पाटील (वय ७०) हे सहा जण याखाली दाबले गेले. मोठा आवाज झाल्याने गावातील लोकांनी धावून जात या सहाही जणांना ढिगार्याखालून काढत त्यांना रूग्णालयात दाखल केले. या सर्व जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.