Home क्राईम भीषण अपघात : ट्रकच्या चाकाखाली आल्याने तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा; तरुण गंभीर

भीषण अपघात : ट्रकच्या चाकाखाली आल्याने तरुणीच्या दोन्ही पायांचा चेंदामेंदा; तरुण गंभीर

0
174


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात बाजार ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे तरुणीचे दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 1 मे रोजी रात्री 8 वाजता घडली आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

नयन मिलिंद तायडे (वय 22, रा.महाबळ) आणि रोहित संजय माळी (वय 21, रा. राधाकृष्ण नगर, जळगाव) असे दोन जण जखमी झालेल्यांची नावे आहे.

जळगाव शहरातील आकाशवाणी चौकाकडून तरुणी नयन तायडे आणि तरुण रोहित माळी हे दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून उड्डाणपुलाकडे वळण घेत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत तरुणी रोडवर पडल्याने तिच्या पायावर ट्रॅकचे दोन्ही चाक गेल्याने तिचा दोन्ही पायांचा चेंदामेंदा झाला. तर रोहित हा गंभीर जखमी झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. या घटने संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप पर्यंत कुठलेही नोंद करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound