जळगाव, प्रतिनिधी | तत्कालीन महासभा व नगराध्यक्ष यांनी ९८-९९ हे हुडकोचे कर्ज फेडतफेडत बरेचसे कर्ज फेडले. हे कर्ज फेडण्यासाठी सरकारकडे दाद मागावी लागते. जे सरकार चिदंबरम, छगन भुजबळ , राज ठाकरे यांच्यावर कारवाई करू शकते ते सरकार ज्यांनी हुडको, जेडीसीसीचे कर्ज फस्त केले अशांवर कारवाई करावी. त्यांच्याकडून पैसे वसूल करून त्याच्यावर कारवाई करावी असे जळगाव जिल्हा जागृत जनमंचे शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
याप्रसंगी प्रा. डॉ. आशिष जाधव, ईश्वर मोरे, अनिल नाटेकर, मुरलीधर खडके, दिगंबर बडगुजर आदी उपस्थित होते.जळगाव महापालिका, राज्य व केंद्रात भाजपची सत्ता आहे. यांनी जळगावला कर्ज मुक्तीचे आश्वासन दिले होते. परंतु, महापालीकेच्या ठेवीतून जेडीसीसी बँकचे कर्ज फेडले. जळगावच्या कराच्या पैशातून हे कर्ज फेडले आहे. तोच घाट हुडकोचे कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात येत आहे. नाशिक कुंभ मेळाला ३४०० कोटीची खिरापत देणाऱ्या सरकारने जळगावला ४०० कोटी न देता पुन्हा मनपाला कर्जदार करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच जळगावच्या गाळेधारकांचा प्रश्न नगरसेवक किवा आमदार सोडवत नाहीत कारण व्यापाऱ्यांकडून येणाऱ्या भाड्यातून मनपाचा फायदा होईल आपला नाही असा स्वार्थी विचार करून व्यापाऱ्यांकडून परस्पर वसुली केली जात असल्याचा आरोप श्री. पाटील यांनी केला. गाळेधारकांचा भाड्याचा नसून तो जाणीवपूर्वक तयार केला गेला आहे. व्यापारी संकुल केवळ जळगावात नसून ते जगातील सर्व शहरामध्ये आहे. जळगाव मध्ये हि योजना फेल ठरली असून यामागे जळगाव लुटण्याची पद्धत असून आ. राजूमामा भोळे यांना आवाहन करतो की, आमदार म्हणून याचा बरकाईने आभ्यास करावा असे आवाहन केले आहे.