जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेतर्फे दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये निवड झालेल्या सोनाली पाटील हिच्यासह दिल्लीत नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेले नूतन मराठा महाविद्यालयाच्या नाटकाचे दिगदर्शक हनुमान सुरवसे यांचा गौरव संस्थेतर्फे करण्यात आला.
संस्थेच्या संचालक व समन्वयकांची सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात मानद सचिव निलेश भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी दोघांचा सत्कार करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली विकास पाटील हिची गार्ड ऑफ ऑनर पदी निवड झालेली होती.तसेच दिल्ली येथील नामांकित संस्था ब्लॅक पर्ल आर्ट्स या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक “हलगी सम्राट” नाटकाने मिळविलेले होते.
त्यामुळे दिग्दर्शक हनुमान सुरवसे आणि सोनाली पाटील या दोघांचा सत्कार संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक महेंद्र भोईटे, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्राचार्य डॉ. बी. के. सोनवणे, प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, सर्व मुख्याध्यापक तसेच एनसीसी विभागप्रमुख प्रा.शिवराज पाटील, प्रा.हेमाक्षी वानखेडे व इतर प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.