जळगाव, प्रतिनिधी | येथील रहिवासी व सध्या जलसंपदा विभाग, खडकवासला प्रकल्प सिंचन भवन ,पुणे येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रेया विरेंद्रसिंग पाटील यांनी २०१९-२० चा पावसाळी हंगामात उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना विशेष प्रशस्तीपत्र पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
२०१९-२० चा पावसाळी हंगामात भीमा व कृष्णा खोरे पूरनियंत्रण कक्ष,पुणे यांचे अधिपत्याखालील धरणांचे दैनिक पर्जन्यमान,जलपातळी,पाणीसाठा,व धरणातून सोडला जाणारा विसर्ग इत्यादी बाबतचा अहवाल संकलित करून तो ई-मेल,फॅक्स, एसएमएस,, वेबसाईट इत्यादी मार्फत संबंधित यंत्रणेला वेळेत सादर करणे याबाबत श्रेय पाटील ह्यांनी सदैव दक्ष व तत्पर राहून जी उल्लेखनीय व अत्यु तकृष्ट कामगिरी केली. त्याबदद्ल कार्यकारी अभियंता , खडकवासला पाटबंधारे विभाग , पुणे, आणि सहाय्यक अभियता तपासणी पथक उपविभाग सिंचन भवन ,पुणे यांनी दखल घेऊन विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्या महावितरण मधील वर्कर्स फेडरेशन चे झोन सचिव विरेंद्रसिंग पाटील यांच्या कन्या आहेत.